नगर : यूपीएससी परीक्षेत गौरव वांढेकर महाराष्ट्रात नववा | पुढारी

नगर : यूपीएससी परीक्षेत गौरव वांढेकर महाराष्ट्रात नववा

पारनेर/निघोज : पुढारी वृत्तसेवा :  निघोज येथील गौरव वसंत वांढेकर यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत राज्यात नववा क्रमांक आला आहे. त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे. गौरव वांढेकर यांनी लोकसेवा आयोगाचा अभ्यास 2018 पासून केला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनात गेली. 2020 मध्ये राज्यसेवेने हुलकावणी दिली. 2021 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

तत्पूर्वी 2021 मध्ये झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेतून त्यांनी राज्यात 6 वा क्रमांक मिळविला होता. राज्य कर निरीक्षक पदी निवड झाली होती. आता लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात त्यांचा राज्यात नववा क्रमांक आला आहे. गौरव यांचे दहावीपर्यंत शिक्षण साईनाथ हायस्कूल अळकुटी येथे झाले इंजीनियरिंग शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द तर अभियांत्रिकी शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे या ठिकाणी झाले. त्यांचे वडील वसंत वांढेकर हे बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध अभियंता, तर आई नंदा वांढेकर गृहिणी आहेत. दरम्यान, वांढेकर यांचे निघोज व परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

Back to top button