नगर : जिल्हा बँक अध्यक्षांची 8 मार्चला निवड | पुढारी

नगर : जिल्हा बँक अध्यक्षांची 8 मार्चला निवड

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची निवड येत्या बुधवारी 8 मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची प्राधिकरणाने नेमणूक केली आहे. नगरच्या जिल्हा बँकेचे संचालक मंडळ हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात काम करत आहेत. जिल्हा बँकेचे तत्कालिन अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते.

त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाने तशी माहिती प्राधिकरणाकडे पाठविली होती. त्यानुसार अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच खाली पाठविण्यात आला आहे. 8 मार्च रोजी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक बोलविण्यात आली आहे. यात अध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. पक्षाच्या नेत्यांकडून या नावावर शिक्कामोर्तब होणार असले, तरी सध्या अनेक नावांची राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Back to top button