नगर : अल्ट्रा मॅरेथॉनची नगरी ‘क्वीन’: 25 पेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये पदके; विद्या बनल्या कुटुंबाचा अभिमान | पुढारी

नगर : अल्ट्रा मॅरेथॉनची नगरी ‘क्वीन’: 25 पेक्षा अधिक मॅरेथॉनमध्ये पदके; विद्या बनल्या कुटुंबाचा अभिमान

अलताफ कडकाले : 

नगर : मॅरेथॉन म्हणजे लांबपल्ल्याची शर्यत. मॅरेथॉनमध्ये पुरुषांचे वर्चस्व राहिलं आहे. परंतु, अलीकडच्या काळात हे चित्र बदललं गेलं. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून धाऊ लागल्या. नगरमधील अशाच एका महिलेनं तंदुरुस्तीसाठी धावायला सुरुवात केली खरी; परंतु आता ती अल्ट्रा मॅरेथॉनची नगरी ‘क्वीन’च झालीय. तिने एक दोन नाही, तर तब्बल 25 मॅरेथॉन लिलया पूर्ण केल्या असून, यात पदकंही पटकाविली आहेत. त्या आपल्या कुटुंबाचा अभिमान बनल्या आहेत.

विद्या दाभाडे यांची मॅरेथॉनमध्ये देदिप्यमान अशी कामगिरी आहे. विद्या यांनी नुकतीच लोणावळ्यातील नावाजलेली अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्या यांनी स्वतःच्या फिटनेससाठी धावायला सुरुवात केली. मात्र, त्यांना पुढे जाऊन मॅरेथॉनची माहिती मिळाली. यात त्यांनी नशीब अजमाविण्याचे ठरवले. पहिली मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग काय, त्यांनी माग वळून पाहिलेच नाही.

सात वर्षात त्यांनी तब्बल 25 मॅरेथॉन पूर्ण केल्या आणि पदकेही पटकाविली. गोवा, पुणे, लोणावळा, हैदराबाद, नाशिक, मुंबई शहरात होणार्‍या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत त्या जिंकूनही दाखविल्या आहेत. हे सर्व करताना त्यांना साथ मिळाली, ती त्यांच्या कुटुंबाची.
पती पंकज दाभाडे यांनीही त्यांना नुसती साथ दिली नाही, तर त्यांच्याबरोबर स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन दिले. नंतर तर सासू, मुलांनाही छोट्या-मोठ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत, स्पर्धेच्या ठिकाणी कौटुंबिक वातावरण निर्माण करून दिले. यामुळेच आज त्या अल्ट्रा मॅरेथॉनच्या नगरी क्वीन बनल्या आहेत.

मॅरेथॉनमध्ये महिला युगाची सुरुवात
स्विट्झरनं मॅरेथॉनमध्ये धावण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिनं आणि तिच्या प्रशिक्षकांनी बोस्टन मॅरेथॉनची नियमावली तपासली. त्यात कुठेही महिलांना बंदी असल्याचा उल्लेख नव्हता. मग मॅरेथॉनसाठी कॅथरिननं आपल्या आद्याक्षरांच्या आधारे के. व्ही. स्विट्झर असं नाव नोंदवलं, त्यामुळं एक महिला शर्यतीत धावते आहे, याची आधी अधिकार्‍यांना जाणीवही नव्हती. कॅथरीन शर्यत सुरू झाल्यावर एक महिला धावत असल्याचं पाहून गोंधळ उडाला. शर्यतीचे संचालक जॉक सेंपल यांनी कॅथरिनला अडवून रेसमधून दूर करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, तिचे प्रशिक्षक अर्नी मदतीसाठी आले. ही शर्यत मग महिला काय करू शकतात, हे दाखवण्याची शर्यतही बनली. कॅथरिनच्या यशानंतरही बोस्टन मॅरेथॉनमध्ये महिलांना सहभागाची परवानगी मिळेपर्यंत पाच वर्षं जावी लागली. जगाच्या कानाकोपर्‍यातील अनेक महिलांसाठी ही मॅरेथॉन काहीतरी करून दाखवू शकतो हा विश्वास देणारी शर्यत बनली.

स्वतःच्या फिटनेसाठी सुरू झालेला व्यायामाचा प्रवास मॅरेथॉनपर्यंत येईल असे कधीच वाटले नव्हते. परंतु, धावता-धावता मॅरेथॉनची आवड निर्माण झाली अन् आज इथपर्यंत येऊन पोहचली. आजच्या तरुणी किंवा नवविवाहितांना इतकच सांगेन की, स्वतःसाठी वेळ मिळत नसतो, तर तो काढावा लागतो. उत्तम डायट आणि सरावातील सातत्याने कुठलंही यश निश्चित मिळते.
                                                                   – विद्या दाभाडे, मॅरेथॉनपटू, नगर

 

Back to top button