नगर : मित्राला भेटायला गेल्याने तिघांकडून बेदम मारहाण | पुढारी

नगर : मित्राला भेटायला गेल्याने तिघांकडून बेदम मारहाण

नगर; पुढारी वृत्तसेवा : मित्राला का भेटायला गेल्याच्या कारणावरून तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. रविवारी (दि.19) रोजी सायंकाळी घडली. याबाबत सोमनाथ रावसाहेब गायकवाड (रा.वाघ गल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ (पूर्ण नाव माहित नाही) व त्याची पत्नी व सासू अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गायकवाड हे गाडगीळ पटांगणाजवळ राहत असलेल्या भाऊ दातरंगे या मित्राकडे गेले होते. त्यावेळी सोमनाथ याची पत्नी व सासू ने गायकवाड यांना तू येथे का आला, असे म्हणत शिवीगाळ केली. नवनाथ याने लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button