पाथर्डी : शिवसेना अधिक बळकट करा : अंबादास दानवे | पुढारी

पाथर्डी : शिवसेना अधिक बळकट करा : अंबादास दानवे

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : पक्ष संघटनेत काम करताना पदाच्या माध्यमातून प्रत्येकला न्याय देऊन सामाजिक कामांकडे लक्ष दिले पाहिजे. आगामी काळात शिवसेना अधिक मजबूत आणि बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या संपर्क कार्यालयाच निष्ठावान शिवसैनिक भाऊसाहेब धस यांची शिवसेना ठाकरे गटाच्या पाथर्डी शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र दानवे यांच्या हस्ते देण्यात आस्. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या पत्राने धस यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाविकास आघाडीतर्फे दानवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख राजू नांगरे, तालुकाप्रमुख भगवान दराडे, बाळासाहेब सानप, मंगल म्हस्के, राजेंद्र म्हस्के, महादेव रहाटे, अविनाश मगरे, उध्दव दुसंग, बबन शेळके, दादासाहेब फुंदे, भाऊसाहेब धस, चंद्रकांत शेळके, सचिन नागपुरे, विकास दिनकर,बाळासाहेब केंदळे आदी उपस्थित होते. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला शहराध्यक्षपदी नियुक्त केले. त्या पदाच्या माध्यमातून भविष्यातील केलेल्या कामाची वरिष्ठां कडून दखल घेतली जाईल, असे काम करूष असे नूतन शहरप्रमुख भाऊसाहेब धस यांनी सांगितले.

Back to top button