संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरात बीओटी तत्त्वावर बांधलेल्या संगमनेर बस स्थानकात बांधलेल्या व्यापारी संकुलास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, संगमनेर येथे परिवहन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.
काळे म्हणाले, संगमनेला सर्व सुविधांयुक्त बस स्थानक व्यापारी संकुल 2019 मध्ये पूर्ण झाले. येथे 120 वासायिक व्यवसाय करतात. या व्यापारी संकुलास शिवसेनाप्रमुख हिंदु हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत परिवहन विभागास आदेश द्यावे. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. सदाशिव लोखंडे व उपस्थित होते. संगमनेर, अकोलेतील वाहन चालकांना श्रीरामपूर येथे 55 कि. मी. अंतर जावे लागते. परिवहन कार्यालय येथे सुरू करावे. संगमनेर येथे जागा उपलब्ध आहे, असे काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.