बोटा : पिस्टलचा धाक दाखवून लुटले | पुढारी

बोटा : पिस्टलचा धाक दाखवून लुटले

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा हद्दीतील माळवाडी परीसरात पिस्टलचा धाक दाखवून दुचाकी स्वाराला लुटल्याची घटना शनिवार (दि. 25) रोजी रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे. किशोर बाळकृष्ण राऊत (रा. नाशिक) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरुन पुणे येथून नाशिकच्या दिशेने जात असताना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास माळवाडी परीसरात आले.

या ठिकाणी तीन दुचाकीवरील अज्ञात सहा इसमांनी त्यांना आडवून ‘तू आमच्या अंगावर का थुंकला म्हणत त्यांना मारहाण केली’ व पिस्टलचा धाक दाखवून दुचाकी, रोख रक्कम व कागदपत्रे घेऊन धूम ठोकली.घटनेची माहिती समजताच प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी राऊत यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.किशोर बाळकृष्ण राऊत यांच्या फिर्यादीवरून घारगांव पोलिस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button