पाथर्डी : बसस्थानकात महिलेचे नेकलेस लंपास | पुढारी

पाथर्डी : बसस्थानकात महिलेचे नेकलेस लंपास

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : येथील नवीन बसस्थानकामधून पुण्याला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधून सोन्याचा नेकलेस चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजता घडली. याप्रकरणी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील मीरा अरविंद घोडके यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मीरा घोडके सध्या हल्ली पुणे येथे राहत असून,पागोरी पिंपळगावला त्या अधून मधून येत असतात. काल रविवारी सकाळी नऊ वाजता पाथर्डी येथून पुण्याला जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या.

त्यांच्याकडे सामानाच्या दोन गोण्या होत्या. तसेच घोडके यांनी सोन्याचा नॅकलेस गळ्यात न घालता पर्समध्ये ठेवला होता. पाथर्डी-पुणे बसमध्ये साहित्या ठेवण्यासाठी चढत असतांना चोरट्याने पर्समधील एक ग्रॅमचे सोन्याचे नॅकलेस चोरुन नेले.
नेकलेसची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

Back to top button