श्रीगोंदा : महादजी शिंदे पादुका स्मारकाची दुर्दशा | पुढारी

श्रीगोंदा : महादजी शिंदे पादुका स्मारकाची दुर्दशा

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा मार्केट यार्ड परिसरात मुख्य रस्त्यालगत असलेले थोर सेनानी सरदार महादजी शिंदे यांचे पादुका स्मृती स्मारक आहे. चारचाकी वाहनांनी जोरदार धडक दिल्याने या ऐतिहासिक स्मारकाचे मोठं नुकसान झाले आहे. सन 1794 रोजी महादजी शिंदे यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यात वानवडी येथे त्यांचे शिंदे छत्री समाधीस्थळ आहे, तर श्रीगोंद्याचे पाटील असल्याने त्यांच्या शौर्याची, स्मृती येथेही या पादुका स्मारकाचे रुपाने जपली आहे. थोर मराठा सेनानी महादजी शिंदे यांची स्मृती असलेले. सन 1794 रोजी उभारण्यात आलेले हे स्मारक आहे.

स्मारकाच्या भिंतीचे दगड निखळून बाजूला सरकले आहेत. ते कधीही कोसळू शकतात. त्यामुळे स्मारक जतन होणे गरजेचे आहे. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून तांत्रिक बाबीची पूर्तता करून हे स्मारक लोकसहभागातून संवर्धित करण्यासाठीं प्रयत्न करू, अशी माहिती ऐतिहासिक वारसा जतन करणारे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.

Back to top button