

सोनई; पुढारी वृत्तसेवा : संत निरंकारी मंडळाच्या सोनई शाखेतर्फे अमृत प्रोजेक्ट अंतर्गत शनिशिंगणापूरमध्ये स्वच्छ जल, स्वच्छ मन संकल्पनेतून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते या अभियानाची सुरवात करण्यात आली.
सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काल संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे आमदार गडाख यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली.
यावेळी आमदार गडाख म्हणाले, संत निरंकारी मंडळाच्या सोनई शाखेतर्फे शिंगणापूर येथे स्वछ जल, स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत पानसनाला प्रकल्पात स्वच्छता मोहीम सुरु केली. मंडळाचे हे काम कौतुकास्पद आहे. आज संपूर्ण देशभर निरंकारी मंडळातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. पानसनाला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो भाविकांकरिता खुला होणार आहे. त्यामुळे शिंगणापूर परिसरातील वैभवात भर पडणार आहे .निरंकारी मंडळाच्या कामाला सहकार्य राहील.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटनिस बाळासाहेब बोरुड़े, विश्वस्त अप्पासाहेब शेटे, पोपटराव शेटे, पोपटराव कुर्हाट, छबूराव भूतकर, शिवाजीराव दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, बापूतात्या शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, रंगनाथ शेटे, सोपानराव बानकर, तुकाराम बानकर आदी उपस्थित होते.