अकोले : अगस्ती साखर कारखान्याची ऊस लागवड योजना जाहीर | पुढारी

अकोले : अगस्ती साखर कारखान्याची ऊस लागवड योजना जाहीर

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अगस्ती सहकारी साखर कारखान्याने सन 2023- 24 साठी अधिकचा ऊस उपलब्ध व्हावा, म्हणून दर एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस बेणे पोहोच योजना, अगस्ति बायोअर्थ आणि सुपर कंपोस्ट सुक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांचा उधारीने पुरवठा, खोडवा पिकाची एक महिना अगोदर ऊस तोडणी अशा विविध योजना सुरू केल्याची माहिती अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सिताराम गायकर यांनी दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही अगस्ती कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

मागील वर्षी कारखान्याने उच्चांकी 6 लाख 22 हजार मे.टनाचे गाळप केले आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 फेब्रुवारी 2023 पासून 31 मे 2023 पर्यंतच्या नवीन सुरु ऊस लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना अगस्ती बायोअर्थ व सुपर कंपोस्ट सेंद्रिय सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत अनुक्रमे 15 मे. टन व 20 गोणी सुपर कंपोस्ट उधारीने देण्यात येईल.

तसेच लागवडीसाठी उधारीने मागणीनुसार बेणे पुरवठा प्रत्यक्ष शेताचे बांधावर करण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी कारखान्याचे मुख्य शेतकी कार्यालय किंवा गट ऑफिस येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी संचालक अजित देशमुख व केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी केले आहे. या योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.

Back to top button