अहमदनगर जिल्हा नामांतराचे स्वागत : महसूल मंत्री विखे पाटील | पुढारी

अहमदनगर जिल्हा नामांतराचे स्वागत : महसूल मंत्री विखे पाटील

लोणी; पुढारी वृत्तसेवा : संभाजीनगर आणि धाराशीव नामांतरा बाबत दिलेले आश्वासन सरकारने पुर्ण केल्याने शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण होत असल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी व्यक्त केली. दरम्यान, अ. नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पा. म्हणाले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्हीही जिल्ह्यांच्या नामांतराचा निर्णय करण्यात आला होता. या निर्णयाला आता दिलेल्या मान्यतेचे स्वागत करीत, याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. शिंदे- फडणवीस सरकार दिलेले आश्वासन पुर्ण करणारे सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्यांना 3 वर्षे सत्तेत राहिल्या नंतरही शेवटच्या कॅबीनेटमध्ये या जिल्ह्याच्या नामांतराबाबत निर्णय घेण्याची बुद्धी सुचली. त्या महाविकास आघाडी सरकारला या निर्णयाचे श्रेय घेण्याचा कोणताही आधिकार नाही, परंतु या नेत्यांना केले नसलेल्या कामांचे श्रेय घेण्याची सवय झाली आहे, असा टोला लगावत ते म्हणाले, जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली जात होती, त्या घटनेचे उदात्तीकरण करुन समर्थन कोणी दिले,याचा खुलासा महाविकास आघाडीतील नेत्यांनी करावा, असे आवाहन मंत्री विखे पा. यांनी केले.

आघाडी सरकारच्या काळातच देवभक्ती व देशभक्ती दाखविणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जात होते, याचा सोयीस्कर विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे. जनता मात्र हे विसरणार नाही, अशा शब्दांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांवर मंत्री विखे पा. यांनी टीकास्त्र सोडले.

अ. नगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना.विखे पा. म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव जिल्ह्याला देणे हे भूषणावह आहे. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करु, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

अहिल्यादेवी यांचे नाव जिल्ह्याला देणे भूषणावह
अ. नगर जिल्ह्याच्या नामांतराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पा. म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव जिल्ह्याला देणे ही भूषणावह बाब आहे.

 

Back to top button