पाथर्डी : पूल बांधकामाचे दोन लाखांचे साहित्य चोरीस | पुढारी

पाथर्डी : पूल बांधकामाचे दोन लाखांचे साहित्य चोरीस

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : रस्त्याच्या पुलाच्या बांधकामासाठी आणलेले सुमारे दोन लाख रुपयांचे लोखंडी साहित्य चोरीस गेल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावाजवळर घडली आहे. याबाबत इंजिनिअर अतिष रमेशराव धोंगडी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गाचे कौडगाव ते पाथर्डी दरम्यानचे रस्त्याचे काम सुरू आहे.

बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख (टेभुर्णी, सोलापूर) यांचे मालकीचे बालासन इन्फ्रास्ट्रक्चर सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावर निवडुंगे जवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील सुमारे दोन लाखांचे लोखंडी साहित्य चोरीस गेले आहे. रस्त्याचे 5 डिसेंबर 2022 पासून काम चालु आहे.

राष्ट्रीय महामार्गावर निवडूगे गावाजवळ पुलाचे काम सुरू असून, त्यासाठी लोखंडी साहित्य आणले होते. बुधवारी रात्री दहा वाजता काम बंद झाल्यानंतर मजूर राहण्याच्या ठिकाणी गेले. गुरुवारी सकाळी सुपरवायझर नानासाहेब सुभाष साबळे, (रा तुळापुर, राहुरी) यांच्या सुमारे दोन लाख रुपयाचे लोखंडी साहित्य चोरी झाल्याचे लक्षात आले. या चोरीचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Back to top button