

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कमलपूर-भामाठाण रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टरसह तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली. (दि.22) रोजी प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त मिळालेल्या गुप्त बातमीनुसार कमालपूर ते भामाठाण परिसरात ही कारवाई सपोनि थोरात, पोसई अतुल बोरसे व पथकाने केली. पोलिसांना पाहून ट्रॅक्टर भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र शिताफिने रात्री 12ः30 वा. ताब्यात घेतले. सुनील बाबुराव मोरे (रा. सर्फराज असगरअल्ली सय्यद रा. भामाठाण, शकिल लतीफ काझी रा. भामाठाण ता. श्रीरामपुर अशी नावे सांगितली.