नगर : टोळक्याकडून तरुणाला जबर मारहाण; जीवे मारण्याची धमकी | पुढारी

नगर : टोळक्याकडून तरुणाला जबर मारहाण; जीवे मारण्याची धमकी

नगर : आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणाला जबर मारहाण झाल्याची घटना प्रोफेसर कॉलनी चौकात मंगळवारी (दि.21) घडली. याबाबत शुभम बबन वाकळे (रा.सावेडी गावठाण) या तरुणाने दिलेल्या जबाबावरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश वैद्य (रा.बोल्हेगाव), ओम कसबे (रा.ढवणीवस्ती), सिद्धेश तागड (रा.तपोवन रस्ता) व इतर चार ते पाच अनोळखी अशी गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांची नावे आहेत.

शुभम हा प्रोफेसर कॉलनी चौकातील कॅन्टीनवर मंगळवारी सायंकाळी चहा पित असताना तेथे आरोपी महेश, सिद्धेश, ओम व इतर चार ते पाच अनोळखी इसम आले. त्यांनी शुभमला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. शुभमने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. महेश वैद्य याने डोक्यात, सिद्धेश याने हातातील फायटरने मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जबाबात म्हटले आहे.

Back to top button