कर्जतमध्ये उभा राहतेय व्यापारी संकुल; खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

कर्जतमध्ये उभा राहतेय व्यापारी संकुल; खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

कर्जत; पुढारी वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जतमध्ये नऊ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये 99 गाळे आहेत. भव्य असे व्यापारी संकुल होणार असून, याचे भूमिपूजन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. व्यापारी संकुल सध्या नगरपंचायतच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

यावेळी आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, गटनेते संतोष मेहेत्रे, उपगटनेते प्राध्यापक सतीश पाटील, सचिन कुलथे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, विशाल मेहेत्रे, लालासाहेब शेळके, देवा खरात, ओंकार तोटे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भूषण ढेरे, अजय भैलुमे, रवींद्र सुपेकर, दादासाहेब चव्हाण, दीपक यादव आदींसह नगरसेवक, समित्यांचे सभापती, मुख्याधिकारी संतोष लांडगे, सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे, कर्जत शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे आदी उपस्थित होते.

यावेळी कर्ज शहराच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारे व व्यापार्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असणारे व्यापारी संकुल उभा करत असल्याबद्दल कर्जत नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक व व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व नगरपंचायतच्या सर्व कर्मचार्‍यांतर्फे खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार व आमदार नीलेश लंके आदींचा सत्कार करण्यात आला.

आमदार नीलेश लंकेंचे जोरदार स्वागत
आमदार नीलेश लंकेंचे कर्जत शहरात प्रथमच आगमन झाले होते. भूमिपूजनासह इतर सर्व कार्यक्रमाला आमदार लंके उपस्थित होते. त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताची विशेष चर्चा आहे.

Back to top button