लोणी : गोगलगावची पाणी योजना सुरू; ग्रामस्थांना मोठा दिलासा | पुढारी

लोणी : गोगलगावची पाणी योजना सुरू; ग्रामस्थांना मोठा दिलासा

लोणी : गोगलगावच्या पाणी पुरवठा योजना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना 2019-20 अंतर्गत 4. 21 कोटी रूपये खर्चाची साकारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटला आहे. थेट लोणी प्रवरा कालव्यातून पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला, अशी माहिती राहाता तालुका दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष त्र्यंबक गायकर यांनी दिली.

गोगलगावच्या भविष्याचा विचार करुन 4 ते 5 हजार लोकसंख्या पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी मंत्री विखे पा., जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा योजनेस 4.21 कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी साठवण तलाव, लोणी ते गोगलगाव पाईप लाईन, पंप हाऊस, शुद्ध पाण्यासाठी फिल्टर, दोन पाण्याच्या टाक्या आदी कामे पूर्ण होऊन ही योजना सुरु झाली आहे.

यामुळे गोलगांवचा मोठा पाणी प्रश्न सुटला आहे. याबद्दल माजी सरपंच संगिता माघाडे, माजी उपसरपंच कैलास खाडे, सरपंच भाऊसाहेब खाडे, उपसरपंच ज्योती सातकर, रामप्रसाद मगर, नामदेव पांढरकर, रावसाहेब चौधरी, अण्णासाहेब खाडे, गणेश गुजर यांनी आभार मानले.

Back to top button