नगर : संकेत नवले खून प्रकरण; अ‍ॅपची माहिती परदेशातून मागविली | पुढारी

नगर : संकेत नवले खून प्रकरण; अ‍ॅपची माहिती परदेशातून मागविली

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संकेत नवले खून प्रकरणाचे कुठले ही धागेद्वारे अध्यापतरी पोलिसाच्या हाती लागले नाहीत. मात्र संकेत नवले जे परदेशी अ‍ॅप्लीकेशन वापरत होता. तेच अ‍ॅप्लीकेशन पोलिसांनी पकडलेले सलमान आणि शाहरुख हे दोघे जण वापरत असल्याचे पोलिस तपासामध्ये निषपन्न झाले असले तरी पोलिस अद्यापतरी मुख्य मारेकर्‍यापर्यंत पोहोचलेच नाही. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात शिक्षण घेणायार्‍या अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रहिवाशी असणारा संकेत नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह शहरातील सुकेवाडीरोडवरील पुनर्वसन कॉलनी जवळील नाटकी नाल्यात मागीलवर्षी 8 डिसेंबरला आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर तब्बल दोन महिन्याने पोलिसांनी मयत संकेत नवले वापरत असलेले परदेशी अँप सलमान व शाहरुख हे दोघेसुद्धा वापरत असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक माहितीच्या आधारे उघड झाले. दरम्यान पोलिसांनी हे परदेशी अ‍ॅप ज्या कंपनीने बनवले आहे. त्या कंपनीकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे. परंतु अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. ती माहिती आल्यानंतरच संकेत नवले खून प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

पोलिसांनी कोठडीत असताना सलमान आणि शाहरुख या दोघांची कसून चौकशी केली असता कुठल्याही प्रकारची नवीन माहिती समोर आलेली नाही. त्यातच दोघांच्याही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यालयात उभे केले असता दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा गुंता वाढत असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

संकेतचे साहित्य मिळेना
मयत संकेत नवलेच्या अंगावर असलेल्या वस्तूंपैकी टोपी चष्मा, सॉक्स हे साहित्य पोलिसांना अद्यापि मिळून आलेले नाहीत. पोलिसांनी आरोपी शाहरुख शेख याच्या घराची झडती घेतली असता त्यांना मयत नवले याच्या कोणत्याही वस्तू व मोबाईल सुद्धा पोलिसांना मिळून आला नाही. त्यामुळे पोलीसही चांगले चक्राऊन गेले आहेत.

Back to top button