सोनई : बोअरवेलमध्ये मोटार टाकण्यावरून हाणामारी | पुढारी

सोनई : बोअरवेलमध्ये मोटार टाकण्यावरून हाणामारी

सोनई; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामवाडी येथील बेल्हेकर कुटुंबांत बोअरवेलमध्ये मोटर टाकण्याच्या कारणामुळे वाद होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाबासाहेब कुसनाथ बेल्हेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलाच्या बोअरवेलमध्ये मोटर का टाकता असे म्हणल्याचा राग आल्याने सिद्धार्थ सुभाष बेल्हेकर, रायभान कुसनाथ बेल्हेकर, सुभाष रायभान बेल्हेकर, संतोष बाबासाहेब बेल्हेकर, शोभा सुभाष बेल्हेकर, जयश्री संतोष बेल्हेकर, शशिकांत कोठुळे, दरंदले (पूर्ण नाव माहित नाही) व तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ, दमदाटी करून काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

36 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून घेतली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रद्धा सुभाष बेल्हेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बोअरवेलमध्ये मोटर सोडायची नाही, हा बोअर आमचा आहे, असे म्हणून बाबासाहेब कुसनाथ बेल्हेकर, योगेश बाबासाहेब बेल्हेकर, आशाबाई बाबासाहेब बेल्हेकर व इतर दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करून सिद्धार्थ बेल्हेकर यास लाथाबक्क्यांनी मारहाण केली. शोभा बेल्हेकर यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण काढून नेले.

Back to top button