नगर : यंदा शिवजयंती दणक्यात होणार ! मिरवणुकीसाठी सात मंडळांना परवानगी

नगर : यंदा शिवजयंती दणक्यात होणार ! मिरवणुकीसाठी सात मंडळांना परवानगी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  तारखेप्रमाणे रविवारी (दि.19) होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची नगरकरांनी जय्यत तयारी केली असून, यंदाची शिवजयंती दणक्यात साजरी होणार आहे. शहरातील सात मंडळांना पोलिस प्रशासनाने मिरवणुकीची परवानगी दिली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर 260 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, 118 जणांना दोन दिवसांसाठी नगरमधून तडीपार करण्यात आले आहे. कोरोनामुळे गत वर्षी शिवजयंती साजरी करण्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीची अट पोलिस प्रशासनाने घालून दिली होती. तसेच मिरवणुकीवरही काही बंधने होती.

दरम्यान, यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. नगरमधून शिवजयंतीची मिरवणूक काढण्यासाठी सात मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी (दि.17) आढावा घेतला. बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांना काही सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जयंती उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 260 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. भिंगार पोलिसांनी 69 जणांवर तडीपारीची कारवाई केली. कोतवाली पोलिसांनी 30 जणांवर तडीपारीची कारवाई केली. तर 50 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एमआयडीसी पोलिसांनी 19 जणांवर कारवाई केली आहे. शिवजयंतीसाठी राजकीय पक्षांकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. राजकीय पक्षांकडून यंदा जोरदार शक्तीप्रर्दशन होण्याची चिन्हे आहेत.

आज महाशिवरात्री ; पोलिसांचा बंदोबस्त
महाशिवरात्री महोत्सवासाठी शहरातील महादेव मंदिरांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील 10 महादेव मंदिरात प्रत्येकी दोन पोलिस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

या मंडळांना मिरवणूक परवानगी
पैलवान प्रतिष्ठाण (माळीवाडा)
शिवबा प्रतिष्ठाण (रेल्वेस्टेशन)
छ.शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती (नालेगाव)
धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठाण (आदर्शनगर)
माळीवाडा ग्रामस्थ-माळीवाडा मित्र मंडळ
साईसंघर्ष युवा प्रतिष्ठाण (सावेडी)
स्व.विशालभाऊ वाकळे मित्र मंडळ (सावेडी)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news