नगरकरांसाठी शुक्रवार ठरला अपघातवार ; दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू | पुढारी

नगरकरांसाठी शुक्रवार ठरला अपघातवार ; दोन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटल्याने कोकमठाण शिवारात भीषण अपघातात एकाचा जागीच तर महिलेचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर कोपरगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारमधील एअर बॅग उघडूनही दोघांना जीव गमवावा लागला. राजेश रहाटे (वय 52 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या अलका वझुलकर (वय 42 वर्षे) यांचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, लीना राजेश रहाटे (वय 18 वर्षे) व अवंतिका वझुलकर (वय 16 वर्षे) या दोन तरूणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर कोपरगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.17) दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात मारुती सुझुकी कंपनीची ब्रेजा कार (क्र.एम एच 49 बीबी 6620) भरधाव वेगाने नागपूरहून नाशिककडे जात असताना कोकणठाण शिवारात डाव्या बाजूचा समोरील टायर फुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार दुभाजकावर आदळली.

धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. दोन्ही एअर बॅग उघडल्या तरीही अपघातात राजेश रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या अलका वझुलकर यांचा खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. लीना राजेश रहाटे व अवंतिका वझुलकर या दोन तरूणी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका व एमएसएफचे जवान मदतीस पोहोचले. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Back to top button