नगर : विरोधकांच्या कोल्हेकुईने ‘त्यात’ खंड पडणार नाही..! : आमदार नीलेश लंके | पुढारी

नगर : विरोधकांच्या कोल्हेकुईने ‘त्यात’ खंड पडणार नाही..! : आमदार नीलेश लंके

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-पारनेर विधानसभा मतदारसंघ माझे कुटुंब असून, कुटुंबप्रमुख या नात्याने सर्वांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. लग्न-समारंभ, मयत, दशक्रिया विधी, वाढदिवस आदी कार्यक्रमाला जाणे मला आवडते, यामुळे त्यांचे सुख वाढते व दु:ख कमी होते. विरोधकांनी कितीही कोल्हेकुही केली तरी, त्यात खंड पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
कामरगाव (ता. नगर) येथील विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव ठोकळ अध्यक्षस्थानी होते.

ग्रामपंचायतच्या नूतन ग्रामसचिवालयाचे लोकार्पण, क्रबस्थानच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजन, जलजीवन पाणीपुरवठा आदी दोन कोटी 37 लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी पारनेर पंचायतचे उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, बाबासाहेब भुजबळ, सरपंच तुकाराम कातोरे, सदस्य अश्विनी ठोकळ, मंगल साठे, शिवा सोनवणे, लक्ष्मण ठोकळ, जिजाबाई ठोकळ, उपसरपंच संदीप लष्करे, राजू आंधळे, अशोक ठोकळ, सिद्धांत आंधळे, श्याम आंधळे, प्रकाश ठोकळ, शिवा सोनवणे, गणेश साठे, प्रकाश कातोरे, राजू पठाण, हाब्बू शिंदे, ग्रामविकास अधिकारी सुरेश मगर, भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर, पिंपळगाव कौडाचे सरपंच बाळासाहेब शिंदे, राम नाणेकर, लक्ष्मण शामराव ठोकळ, बापू माउली, गोरख साठे, गणेश आंधळे, शैला भांबरे आदी उपस्थित होते.

यावेळी वसंतराव ठोकळ यांनी ग्रामस्थांना भेडसावणार्‍या अडचणी, शेतकर्‍यांना सध्या चार तासच वीज शेतीपंपासाठी मिळते, ती पूर्वीप्रमाणे आठ तास वीज मिळावी, अशी त्यांनी मागणी केली. आमदार लंके यांनी यापुढे गावातील रस्ते, सभामंडप, दशक्रिया विधी घाट, हायमास्ट दिवे, पाणंद रस्ते, शिव रस्ते यासाठी भरीव रक्कम देण्याचे जाहीर केले. संदीप ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. युवा नेते अंकुश ठोकळ यांनी आभार मानले

Back to top button