नगर : रायतेवाडीत 500 किलो गोमांस पोलिसांनी पकडले | पुढारी

नगर : रायतेवाडीत 500 किलो गोमांस पोलिसांनी पकडले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहर पोलिसांनी कारमधून विक्रीसाठी नेत असलेले 500 किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चारचाकीसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  याबाबत संगमनेर शहर पोलिसां कडून सांभाळलेली अधिक माहिती अशी की, जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून नाशिक-पुणे महामार्गावर गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी रायतेवाडी फाटा या ठिकाणी नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी करीत असताना एका कारमध्ये पोलिसांना गोमांस आढळले. पोलिसांनी कारमधून 500 किलो व मांस जप्त केले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमा च्या विरोधात गो-हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.अंधाराचा फायदा घेऊन कार चालक पसार झाला.

Back to top button