नगर : कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी

नगर : कारची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील नान्नज-जामखेड रस्त्यावरील झिक्री शिवारात कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. इंजमाम अहमद पठाण (वय 23, रा. नान्नज, ता. जामखेड) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. सोहेल मस्जिद पठाण (वय 22), मुदस्सिर मस्जिद पठाण (वय 18) हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

दुचाकीवरून हे तिघे नान्नजकडून जामखेडकडे जात होते. तर कार जामखेडकडून नान्नजकडे जात होती. या दोन्ही वाहनांची झिक्री शिवारात जोरदार धडक झाली. त्यामध्ये दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. कार दोनदा खड्ड्यात जाऊन उलटली. यामध्ये शिक्षक बालाजी कांबळे बालंबाल बचावले. एका पिकअप चालकाने दुधाचे कॅन बाजूला सरकून या तिन्ही रुग्णांना जामखेड येथील खासगी रुग्णालयात पोहोचविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळास भेट दिली. इंजमाम पठाण यांच्या मृतदेहाचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Back to top button