File Photo
File Photo

नगर : व्यावसायिकांवर शुल्क बोजा ; पाचशे ते 15 हजार रुपयांपर्यंत करभार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गटई कामगार व सलून व्यावसायिक वगळता अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून व्यवसाय शुल्क आकारण्यास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली.  पडणार आहे. दरम्यान, केबल व गॅस लाईनसाठी रस्ता खोदाईचे दरही वाढविण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत आता भरघोस अशी भर पडेल, असा दावा करण्यात आला. नगर शहरात सुमारे 30 ते 40 हजाराहून अधिक व्यावसायिक आस्थापना आहेत. त्यांच्याकडून परवाना शुल्क आकारले तर उत्पन्नात वाढ होईल.

प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण केल्यास व्यवसाय परवाना शुल्क आकारणे सोईचे होईल. व्यवसाय शुल्काची बिले घरपट्टी बरोबर दिल्यास तेच कर्मचारी वसुली सुद्धा करतील. त्यामुळे अतिरिक्त कर्मचारीही लागणार नाही. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. सभापती वाकळे यांनी छोट्या व्यावसायिकांकडून शुल्क आकारणी करणे उचित ठरणार नाही. त्यांची उपजीविका त्यावर अवलंबून असते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना वगळून अन्य मोठ्या व्यावसायिकांकडून शुल्क आकारणी करावी, असा निर्णय दिला. त्यावर उपायुक्त डांगे यांनी शहरातील गटई कामगार व सलुन चालकांना वगळून अन्य व्यावसायिकांकडून शुल्क आकराणी करू असे सांगितल्यानंतर त्याला स्थायी समितीने मंजूरी दिली.

रस्ते खोदाईच्या दरात वाढ
केबल कंपन्या, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करणार्‍या कंपन्या शहरातील डांबरी रस्ते, सिमेंट काँक्रिटचे रस्ते खोदाई करतात. रस्त्यासोबतच पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, गटार लाईनचे नुकसान होते. त्या खोदाईपोटी प्रति मिटर दोन हजार रुपयांप्रमाणे पैसे आकारते. परंतू नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, पुणे महापालिका यांच्या तुलनेत नगर महापालिकेचे दर तोकडे आहेत. तसेच सावंतवाडी नगर परिषद, बदलापूर नगर परिषद यांचेही दर जास्त आहेत. त्यामुळे रस्ते खोदाईचे दर प्रति मिटर दहा हजार रुपये करावे, अशी मागणी केली. हा विषय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. केवळ घरगुती कामासाठी रस्ता खोदाईचा दर दोन हजार ठेवण्यात आला. दरम्यान, महापालिका हद्दीत मांडव व साहित्य ठेवण्यासाठीचे दर शंभर रुपयांनी वाढले. तर, रक्तपेढीचे दर जैसे थे ठेवले. भिस्तबाग महाल सुशोभिकरणास मान्यता देण्यात आली.

यांचे भाडे वाढले
महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर मांडव व साहित्य ठेवल्यास त्याचे भाडे वाढविण्यासाठी स्थायी समितीत चर्चा झाली. धार्मिक व सामाजिक कार्यक्रम वगळून त्याचे भाडे प्रतिदिन शंभर रुपयांनी वाढविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये राखी, पतंग उत्सवाचे स्टॉल, दिवाळी साहित्य, नवरात्र पूजा साहित्य, गणपती पूजा साहित्य, रसवंती गृह, जाहिरातीची कमान, खासगी कंपन्याचे स्टॉल, बांधकाम साहित्य ठेवणे, कौटुंबिक कार्यक्रम.

logo
Pudhari News
pudhari.news