नगर : साकेगावात अवैध वाळू उपशावर कारवाई | पुढारी

नगर : साकेगावात अवैध वाळू उपशावर कारवाई

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  अवैध वाळू उपशावर कारवाई करत, पाथर्डी पोलिसांनी सात लाख पाच हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पाथर्डी-शेवगाव रस्त्यावर साकेगाव चौकात सोमवारी दुपारी ही पोलिसांनी कारवाई करण्यात आली. पागोरी पिंपळगाव ते साकेगाव रस्त्याने कारभारी रघुनाथ कराळे हा एका निळ्या रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर व डंपींग ट्रॉलीसह विनापरवाना चोरून वाळू वाहतूक करत असल्याचेी माहिती पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.

त्यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कॉन्स्टेबल भगवान सानप, रामदास सोनवणे, अरुण शेकडे, सचिन नवगिरे, राजेंद्र बडे, अनिल बडे, देविदास तांदळे यांचे पथक साकेगाव चौकात जाऊन थांबले.  यावेळी पागोरी पिंपळगावकडून साकेगाव रसत्याने ट्रॅक्टर ट्रालीसह वाळू वाहतूक करताना दिसला. पथकाने ट्रॅक्टर थांबवून ताब्यात घेतला. ट्रॅक्टर चालक कारभारी रघुनाथ कराळे (वय 27, रा. सांगवी खुर्द ता. पाथर्डी) याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

Back to top button