नगर : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; घातक शस्त्रांसह पाच लाखांचा मुद्दमाल पोलिसांनी केला जप्त

नगर : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद ; घातक शस्त्रांसह पाच लाखांचा मुद्दमाल पोलिसांनी केला जप्त

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीकडून घातक शस्त्रासंह 5 लाख 12 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडाळा शिवारात शनिवारी (दि.11) पहाटे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. खंडाळा शिवारात शनिवारी (दि.11) पहाटे काही इसम घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयितरित्या फिरत असल्याची सानप यांना मिळाली. त्यांनी तातडीने उपनिरीक्षक युवराज चव्हाण, उपनिरीक्षक रणजित मारग, उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह कर्मचार्‍यांची वेगवेगळी पथके तयार करून खंडाळा गावाकडे रवाना झाले. पहाटे 2.30 च्या सुमारास ही पथके खंडाळा या इसमांचा शोध घेत असताना, 5 संशयित हायवेच्या दिशेने पळताना दिसून आले. ते सर्वजण क्रुझर गाडीत (क्र. एम.एच.20, बी.वाय.3468) बसून अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळाले.

क्रुझर गाडी नगरच्या दिशेने जात असताना पोलिस पथके व खंडाळ्याचे विकास लोटके व ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करत क्रुझर गाडी पुणे हायवेवरील केडगाव बायपास चौकात पहाटे 3 च्या सुमारास थांबविली. गाडीतील इसमांना ताब्यात घेतले. सिकंदर सिंग शक्तीसिंग ज्युनि (वय 38), जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक (वय 30), दलसिंग बालासिंग टाक (वय 19, सर्व रा. आलाना, ब्रुकबाँन्ड जवळ, गेवराई, औरंगाबाद), शाह अन्सार मंजूर शाह, (वय 21, रा. चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत. क्रुझर गाडीत विविध प्रकारचे लोखंडी पान्हे, लोखंडी रॉड, कोयते, स्क्रूड्रायव्हर, रस्सी, लोखंडी साखळी, विळा, लोखंडी पाईप, लोखंडी हुक पाईप, असा 5 लाख 12 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल आढळला. त्यांना पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news