नगर : तुमचे राजकारण स्वार्थी, टक्केवारीचे ; अ‍ॅड. ढाकणे  यांची महाआघाडीच्या संंवादयात्रेत आमदार राजळेंवर टीका | पुढारी

नगर : तुमचे राजकारण स्वार्थी, टक्केवारीचे ; अ‍ॅड. ढाकणे  यांची महाआघाडीच्या संंवादयात्रेत आमदार राजळेंवर टीका

खरवंडी कासारः पुढारी वृत्तसेवा  : आमदार होताना पंकजाताई मुंडे ह्या यांच्या बहीण असतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे यांचे आदर्श असतात. मग आमदार झाल्यानंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे नेते कसे होतात. गहिनीनाथ गडावर पुण्यतिथीला देवेंद्र फडणीस आले होते, तेथे पंकजा मुंडे आल्या नव्हत्या. मग आमच्या बहिणाबाई (मोनिका राजळे) तेथे कशा गेल्या होत्या. तुमच्या स्वार्थाचे व टक्केवारीचे राजकारण आमच्या समजण्याच्या पलीकडचे असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली.

खरवंडी येथे भाऊ-बाबा मंगल कार्यालयात महाआघाडीच्या सवांद यात्रेच्याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ढाकणे बोलत होते. अध्यक्षस्थानी आण्णासाहेब खेडकर होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, गहीनीनाथ शिरसाट, बंडुपाटील बोरुडे, किरण खेडकर, राजेंद्र हिंगे, राजु जगताप, विष्णु थोरात, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भगवानराव दराडे, बाळासाहेब बटुळे, बाळासाहेब दराडे, भगवान हजारे, दीपक ढाकणे, पप्पु दहीफळे, सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, हुमायुन आतार, सरपंच सुरेखा ढाकणे, गणेश सुपेकर, अनिल ढाकणे, आंबादास राऊत, बाळासाहेब जगताप, उद्धव दुसंग, आबासाहेब जायभाये उपस्थीत होते.
ढाकणे म्हणाले, मी आमच्या बहीनाबाईंना (मोनिका राजळे) बाराशे कोटीचा निधीचा हिशोब मागितला.

मी विरोधी पक्षात असलो तरी मला एक लाख लोकांनी मते दिले आहेत. मला हिशोब मिळाला नाही. मतदार संघातले प्रश्न जसे होते तसेच आहेत. मग विकास नेमका कोणाचा झाला. आमदार झाल्या की तुम्ही तुपाशी अन जनता उपाशी हे कसे होते. तुमचे मुंडे साहेबावरचे प्रेम मते घेण्यापुरतेच आहे का. पाच वर्षापुर्वी पाथर्डीत मुंडे यांचा पुतळा लोकवर्गणीतुन करण्याची घोषणा केली. वर्गणी गेली कुठे? पुतळा गेला कुठे ? पाथर्डीचे गटारीचे पाणी जाते तिथे मुंडेंचा पुतळा उभारणार का, असा सवालही ढाकणेंनी केला. राज्याचे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतीपिकाला भाव नाहीत. महागाई, बेरोजगारी वाढली. युवक दिशाहिन झालेत. महाआघाडीचे सरकार होते तेव्हा कापसाला दहा हजाराचा भाव होता आता सात हजार भाव का झालेत. जनतेने हे ओळखले पाहीजे, असेही ढाकणे म्हणाले. किरण खेडकर यांनी प्रस्ताविक केले. महारुद्र किर्तने यांनी आभार मानले.

व्यापारी अन् त्यांच्या जागाही सुरक्षीत नाहीत
पाथर्डी शहरात व्यापारी व त्यांच्या जागा देखील सुरक्षीत राहले नाहीत. गुंडाकडुन जमीनी बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. हे गुंड कोणाच्या आशिर्वादाने हे करीत आहेत,जनतेला सर्व समजते आहे. अतिक्रमणे करणार्‍यांच्या दुकानाचे उद्घाटन तुम्ही करता, म्हणजे तुमची भागीदारी आहे समजायचे का? हे थांबले पाहिजे. शहरातील बाजारपेठ वाचली पाहिजे, असे अ‍ॅड. ढाकणे यांनी सांगितले.

 

Back to top button