शिर्डी : श्री साई परिक्रमा महोत्सवास लाखो सेवक सज्ज | पुढारी

शिर्डी : श्री साई परिक्रमा महोत्सवास लाखो सेवक सज्ज

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्री साईबाबांची कर्मभूमी शिर्डी नगरीस परिक्रमा करून पुण्याचा संचय करण्यास लाखो साईभक्त उत्सुक झाले आहेत. त्यांना मुलभूत सुख- सुविधा देण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांसह श्री साईबाबा संस्थान व शिर्डी नगर परिषद सरसावली आहे. यंदाच्या श्रीसाई परिक्रमा महोत्सवाची वेगाने जय्यत तयारी सुरू झाली आहे. शिर्डीमध्ये सोमवार (दि. 13 फेब्रुवारी) रोजी श्री खंडोबा मंदिरापासून ही परिक्रमा सुरु होणार आहे. शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान, ग्रीन एन क्लीन फाऊंडेशन, नगर परिषद व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी श्रीसाई परिक्रमा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.

अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपलेली श्री साई परिक्रमा असंस्मरणीय ठरविण्यासाठी अनेक संस्था, संघटना, आपले दातृत्व देण्यासाठी तत्पर झाल्या आहेत. या परिक्रमेसाठी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी रतलाम येथील श्रीसाई भक्तांची निवास व्यवस्था केली आहे. शोभायात्रेत रथ आदी सजवण्यास हॉल उपलब्ध करून दिला आहे. हॉटेल साई विश्वचे अतुल गोंदकर यांनी मोफत 23 तर हॉटेल गुरुकृपाचे रमेश प्रेमानी मोफत 14 खोल्या उपलब्ध करून देणार आहेत. राहाता तालुका केमिस्ट असोशियन यांच्याकडून श्रीसाई भक्तांसाठी मोफत प्रथमोपचार व 10 हजार ऊर्जा पेय देण्यात येणार आहे.

साई सिद्धी रिक्षा संघटना कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली 100 रिक्षा साई भक्तांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती रिक्षा संघटनेच्या वतीने 15 रिक्षा साई भक्तांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिर्डी शहरातील सर्व अ‍ॅम्बुलन्स धारकांच्या वतीने 15 अ‍ॅम्बुलन्स श्रीसाई भक्तांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहे. डॉ. सुभाष गुजराती मेमोरियल हॉस्पिटल व डॉ. जोशी हॉस्पिटल यांचे कडून मोफत वैद्यकीय सेवा पथक देण्यात येणार आहे. श्रीसाईभक्तांनी श्रीसाई परिक्रमा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Back to top button