नगर : मोहिनीराज यात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच

नगर : मोहिनीराज यात्रेवर सीसीटीव्हीचा वॉच

कैलाश शिंदे : 

नेवासा : नेवाशाचे ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेवर वाँच राहण्यासाठी शहरात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कँमेर्‍यांमुळे थेट प्रक्षेपण नेवासा पोलिस ठाण्यात दिसणार आहे. कॅमेरे बसविल्यामुळे पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेचे काम सहज सोपे होणार आहे. शहरातील तिसर्‍या डोळ्याचे प्रक्षेपण पोलिस ठाण्यात दिसणार असल्याने ठाणे अंमलदार बसल्या जागेवरून यात्रा परिसरात वाँच ठेवणार आहे. ग्रामदैवत मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीचे मंदिरातून पाकशाळेत मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. यावेळी नागरिकांत उत्साह चांगला दिसून आला आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोमवारपासून पाकशाळेत सायंकाळी महाप्रसादाच्या पंगती सुरू झाल्या आहेत. 10 फेब्रुवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

या यात्रेसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व यात्रा सुरळीत पार पडण्याकरिता मंदिर परिसरात व अन्य काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कँमेर्‍यांमुळे पोलिसांचा वाँच राहणार आहे. त्याच बरोबरच या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत होणार्‍या घडामोडींचे थेट प्रक्षेपण पोलिस ठाण्यात ठाणेअंमलदारांच्या रूममधील टी व्ही स्किनवर दिसणार आहे. या प्रक्षेपणामुळे पोलिसांचे काम सोपे होईल. पहिल्यांदाच हा प्रयोग होत असल्याने नेवासकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे यापुढेही कायम स्वरूपी राहणार आहेत. पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणा सर्वत्र लक्ष ठेवून आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news