नगर- दौंड मार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू | पुढारी

नगर- दौंड मार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर-दौंड मार्गावर हिवरे झरे गावाजवळ भरधाव वेगात जाणार्‍या दोन मालट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.5) सायंकाळी 6.35 वाजता हिवरे झरे गावाजवळ घडली. समाधान पोपट पगार (वय 39, रा.खुंटेवाडी, ता. देवळा, जि.नाशिक), असे त्याचे नाव आहे.

हिवरे झरे गावाजवळ बसस्थानका शेजारील एका दुकानासमोर हा अपघात झाला. समाधान पगार हा मालट्रक घेऊन दौंडकडून नगरच्या दिशेने येत असताना नगरहून दौंडकडे येणार्‍या मालट्रकने (आर.जे.11 जी. डी.2247) दुसर्‍या ट्रकला समोरून कट मारताना एका बाजूला धडक दिली. त्यामुळे पगार यांचा ट्रक रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जावून धडकला. या धडकेत चालक पगार यांना गंभीर जखम झाल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत त्यांचा सहकारी दिलीप गणेश तांबे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी पसार झालेल्या ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला.

Back to top button