बोटा : कंटेनर उलटून चालक झाला गंभीर जखमी | पुढारी

बोटा : कंटेनर उलटून चालक झाला गंभीर जखमी

बोटा; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मालवाहतूक कंटेनरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मालवाहतूक कंटेनर उलटला. रविवार (दि. 5) रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे. यात चालक जखमी झाला आहे. कंटेनर चालक वाजीद खान हा संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने त्याच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक (एनएल 01 एएफ 2966) हा घेऊन चालला होता.

दरम्यान तो माहुली परीसरातील एकल घाटात आला असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट महामार्गालगत असलेल्या साईड गटारीत उलटला. यात कंटेनरचे मोठे नुकसान झाले तर चालक वाजीद खान बालंबाल बचावून गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button