पाथर्डी : छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करू; पोलिस निरीक्षक चव्हाण यांची ग्वाही

पाथर्डी : छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करू; पोलिस निरीक्षक चव्हाण यांची ग्वाही

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : मुलींना शाळा-कॉलेजमध्ये येताना टारगटांकडून वेगवेगळ्या जाचाचा सामना करावा लागतो. आता अशा टवाळखोरांनाचा न घाबरता आपण सामना करावा. पोलिस मुलींचे सदैव रक्षण करतील. कोणी छेड काढल्यास आमच्याशी संपर्क करा, छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करू, असे ग्वाही पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले.

विद्यार्थ्यांना येणार्‍या अडीअडचणीवर व मुलींची छेड काढणारे, तसेच मुलांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती अथवा टारगटांकडून होणारा त्रासावर पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालय व बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य अशोक दौंड,पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, गुप्त वॉर्ता शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप, पर्यवेक्षक दिलावर फकीर, सुधाकर सातपुते आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, मुलींना कोणताही व्यक्ती अथवा तरूण त्रास देत असेल, तर आम्हाला कळवा तुमचे नाव गोपनीय ठेवून त्याचा बंदोबस्त केला जाईल. विद्यार्थिनींची छेड काढणारे सर्वच मुले वाईट नसतात. एखादा वाईट प्रवृत्तीचा मुलगा असतो. मुलींप्रमाणे मुलांनाही काही टवाळखोर गुंड प्रवृत्तीच्या टोळ्यांकडून त्रास देण्यात येतो.

शिक्षण घेत असताना शैक्षणिक जीवनाच्या वाटचालीकडे लक्ष द्या ज्या आपेक्षांनी आणि विश्वासाने आपल्याला पालकांनी पाठवला आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करा, कॉलेजच्या अथवा शाळेच्या नावाखाली विनाकारण नको त्या गोष्टी आपल्याकडून घडू नये, याची काळजी घेतली, तर आपले भविष्य उज्ज्वल असेल. सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी करून आभार अशोक दौंड यांनी मानले.

पोलिसांनी दिला मुलींना विश्वास
पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप यांनी विद्यार्थिनींच्या ग्रुपला स्वतंत्रपणे संवाद साधत तुमच्या बरोबर पोलिस बांधव कायम आहे. कोणालाही घाबरण्याची गरज नसून, केव्हाही तुम्ही पोलिसांची मदत मागा. तुम्हाला ती मदत केली जाईल. पोलिस ठाणे व आमचा वैयक्तिक मोबाईल नंबर तुमच्याकडे ठेवा. तुम्हाला त्रास होईल, तेव्हा आम्हाला संपर्क साधत चला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news