सोनई : कत्तलीतून 22 जनावरांची सुटका; तिघांविरुद्ध गुन्हा

सोनई : कत्तलीतून 22 जनावरांची सुटका; तिघांविरुद्ध गुन्हा

सोनई; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकून सोनई पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या 22 जनावरांची सुटका केली. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी कत्तलीसाठी गोवंश जातीची लहान-मोठी जनावरे आणल्याची माहिती गुप्त बातमीदारकडून सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी पथकासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला. तेथे अंदाजे 3 लाख 62 हजार रूपये किमतीची गोवंश जातीची लहान-मोठी एकूण 22 जनावरे आढळून आली. ही जनावरे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून पाथर्डी येथील नंदनवन गोशाळेते पाठवण्यात आली.

याप्रकरणी बाबू दाऊद शेख (वय 35), जावेद युसुफ शेख (वय 44) व हातिम शब्बीर पठाण (वय 22, सर्व रा.चांदा, ता. नेवासा) या तिघांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार राजेंद्र औटी, प्रवीण आव्हाड, दत्तात्रय गावडे, सोमनाथ झांबरे, वैभव शित्रे, निखिल तमनर, मृत्युंजय मोरे, सचिन ठोंबरे, अमोल भांड यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news