नगर जिल्ह्यातील 15 कारखान्यांचे 76.90 लाख मे. ऊस गाळप

नगर जिल्ह्यातील 15 कारखान्यांचे 76.90 लाख मे. ऊस गाळप

कोपरगाव; पुढारी वृत्तसेवा : अ. नगर जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 3 फेब्रुवारीपर्यंत 76 लाख 90 हजार 856 मे टन उसाचे गाळप केले. यातून 71 लाख 33 हजार 815 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले तर दैनंदिन साखर उतारा 11.61 असा आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात. साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे:-

अंबालिका (11 लाख 4 हजार 670 मे.टन) (11 लाख 31 हजार 650 साखर पोते). (11.49 साखर उतारा), मुळा (681710) (500700), (11.91), थोरात (727700) (828370), (12.60), ज्ञानेश्वर (809260) (752450) (11.80), सहकार महर्षि नागवडे श्रीगोंदा (521847) (522700), (11.10), पद्मश्री विखे पा. (576700) (405680), (12.00), कुकडी (416150) (412450), (11.00), अशोक (394170) (399900) (11.80), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (461457) (357350), वृध्देश्वर (276014) (275800), अगस्ती (299625) (315920), (11.75), केदारेश्वर (2787677) (243900). (11.56), कर्मवीर शंकरराव काळे (327713) (357100), (12.00), गंगामाई (692880) (524500) (11.45), गणेश (119200)(105345) (11.14) याप्रमाणे गळीत झाले.

जिल्ह्यातील काही कारखान्यांनी दैनदिन गाळप क्षमता वाढविली आहे. आधुनिकीकरण वेगात होत आहे. सहकारी साखर कारखानदारीने अ. नगर जिल्ह्याला समृध्द करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासुन पर्जन्यमान चांगले झाले, पण 2022.23 गळीत हंगामात शेतकर्‍यांना अपेक्षेपेक्षा उसाचे टनेज चालू वर्षी अत्यंत कमी बसले.

यामुळे जिल्ह्याचा साखर हंगाम एक महिना आधीच बंद होणार आहे. पुढच्या वर्षी उसाची कमतरता भासणार आहे. कारण शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यात वैजापुरसह अन्य ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होत आहेत. साखर कारखानदार शेतकर्‍यांना उसाचा उतारा चांगला यावा म्हणून ठराविक ऊस लागवडीची सक्ती करतात. काही कारखाने त्यांच्याच शिफारशीनुसार उस वाण निवडतात. शेतकर्‍याला उसाचे वजन चांगले मिळावे म्हणून तो को 265 उस वाण लागवडीचे नियोजन करतो.

जिल्ह्यात दररोज सव्वा लाख मे टन उसाचे गाळप
राज्यात उसाचे आगार म्हणून कोल्हापूर नंतर अ.नगर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात 22 साखर कारखाने आहेत. ते दररोज 1 ते सव्वा लाख मे टन उसाचे गाळप करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news