राहुरी तालुका भाजप अध्यक्ष निवड प्रलंबित

राहुरी तालुका भाजप अध्यक्ष निवड प्रलंबित

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुका भाजप अध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आ. चंद्रशेखर कदम, संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग आदींच्या प्रमुख उपस्थित येथे झालेल्या बैठकीत तब्बल इच्छुक 28 जन आल्याने अखेर निर्णय प्रलंबित राहिला. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेवू, असे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जाहीर केले.

राहुरी तालुका भाजपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत राहुरी येथील मुळा- प्रवरा संस्था कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी इच्छुकांची संख्या वाढल्याने निर्णय झाला नाही. इच्छुक 28 पैकी एका व्यक्तीचे नाव दिल्यास त्वरित अध्यक्ष जाहीर करू सर्वांनी एकमत करावे, असे जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी सांगितले, परंतु एकमत झालेच नाही. त्यामुळे खा. डॉ. सुजय विखे पा., माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आ. चंद्रशेखर कदम, आ.राम शिंदे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थित जिल्हास्तरीय कोअर कमिटीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे मुंडे यांनी शेवटी जाहीर केले.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, सुरेशराव बानकर, सुभाष गायकवाड, रविंद्र म्हसे, सर्जेराव घाडगे आदींसह 28 कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली. माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी यावेळी सांगितले की, भारतीय जनता पार्टी या पक्षांमध्ये कार्यकर्ता हा घटक खूपच महत्त्वाचा आहे. तालुक्यामध्ये संघटना वाढविण्यासाठी महत्त्वाचे कार्य करणार्‍या व्यक्तीला संधी मिळणे गरजेचे आहे. जो कोणी अध्यक्ष होईल त्यांना काम करावे लागेल.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले , भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची चांगली संधी आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यातील तळागाळा पर्यंत चांगले संघटन असणार्‍या व्यक्तीला पद मिळणे गरजेचे आहे. सर्व इच्छुक पक्षात काम करणारे असले तरी कोणालातरी एकालाच संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे निवड जाहीर झाल्यानंतर सर्वांनी गट तट बाजूला ठेवून पक्षामध्ये काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news