देवळाली, पिंपळगाव फुणगीत गावठी दारू जप्त | पुढारी

देवळाली, पिंपळगाव फुणगीत गावठी दारू जप्त

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह पिंपळगाव फुणगी हद्दीत पोलिसांनी अचानक छापे मारीत 4 ठिकाणी गावठी दारू नष्ट केली. देशी, दारूच्या बाटल्यांचा साठाही जप्त करण्यात आला. दरम्यान, चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सज्जन नर्‍हेडा, पो. ह. अजिनाथ पाखरे, संतोष राठोड, ढाकणे, वाघमारे, सचिन ताजणे, नदिम शेख, सचिन बर्डे, गुंजाळ, गुणवंत, कांबळे, रोहोकले, अहिरे, चेमटे यांच्या पथकाने देवळाली प्रवरा हद्दीसह पिंपळगाव फुणगी येथे अवैध दारू विक्री गुत्त्यांवर छापेमारी केली.

बापू भास्कर गायकवाड येथे छापा टाकून गावठी दारू नष्ट केली. 150 लिटर दारू व रसायन पोलिसांनी नष्ट केले. यामध्ये 88 हजार रुपये किमतीची गावठी दारू व रसायन, दीड हजाराची टँगो देशी दारू आढळली. गोरख बबन गायवाड 13,500 रूपयांची गावठी दारू तसेच 7 हजार 200 रूपयांचे कच्चे रसायन, शंकर राजाराम गायकवाड (सर्व रा. वडारवाडा, देवळाली प्रवरा) या अवैध दारू विक्रीवर छापे मारुन 80 हजारांचे कच्चे रसायन जप्त तर 7, 500 रुपयांची दारू नष्ट केली. यानंतर पिंपळगाव फुणगी येथे छापे टाकले.

Back to top button