नेवासा : डायल 112 वर कॉल; मी मर्डर केला? खोटी माहिती देणारे जेलमध्ये | पुढारी

नेवासा : डायल 112 वर कॉल; मी मर्डर केला? खोटी माहिती देणारे जेलमध्ये

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : सद् रक्षणाय…खलनिग्रहणाय बीद्र घेऊन जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन. वार्‍याची पर्वा न करता गृहखाते 24 तास जनतेच्या मदत कार्यात सक्रिय सहभागी असते. मात्र, पोलिसांनाही सतत उल्लू बनविण्याच्या घटनेत तालुक्यात चांगलीच वाढ झाली. मंगळवारी (दि.31) रोजी रात्री पोलिस गस्तीवर असताना डायल 112 वर कॉल आला की, मी मर्डर केला आहे.

त्यामुळे नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी गस्तीसाठी रवाना झालेल्या पोलिस पथकाला घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी रात्र जागून काढली. मात्र, मर्डर केला सांगणारा व ज्याचा मर्डर झाला अशी माहिती देणारे ते दोघे गप्पा झोडतांना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच खोटा कॉल करणार्‍यांची चांगलीच दमछाक उडाली.

शिरसगाव (ता.नेवासा) येथे दत्तू लांडे हा जेसीबी मशिनने माती उकरून रस्त्याच्या कडेला व त्याच्या शेत बांधाजवळ खांब उभा करून अतिक्रमण करीत आहे, अशी माहिती खबर देणार्‍या अमोल लंघेंनी पोलिसांना दिल्यावर पोलिस लवकर येणार नाहीत? म्हणून चक्क मी मर्डर केला आहे, अशी खोटी माहिती डायल 112 वर दिल्याने पोलिसांची धावपळ उडाली. घटनास्थळी पोलिस आल्यावर कोणतीही अनुचित घटना घडली नसल्यामुळे पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच खोटी माहिती देणार्‍यीच भंबेरी उडाली.

Back to top button