करंजी : नळयोजनेची अधिकार्‍यांकडून पाहणी; निकृष्ट कामाच्या वृत्ताची दखल

करंजी : नळयोजनेची अधिकार्‍यांकडून पाहणी; निकृष्ट कामाच्या वृत्ताची दखल
Published on
Updated on

करंजी; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगाव पाणी योजनेचे काम निकृष्ट कामाचे वृत्त 'पुढारी'ने प्रसिध्द करताच संबंधित अधिकार्‍यांनी या कामास भेटी देऊन संबंधित ठेकेदारास सूचना दिल्या आहेत. परंतु, शेतकर्‍यांच्या तक्रारी पूर्वी झालेल्या 50 कि.मी. कामाची चौकशी होऊन हे काम पुन्हा करण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे.

पश्चिम भागाच्या सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा करुन योजनेस मंजुरी मिळविली. या योजनेत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, केशव शिंगवे, रुपेवाडी, सातवड, आडगाव, शिरापूर, जवखेडे खालसा, करडवाडी, कासार पिंपळगाव, पारेवाडी, कासारवाडी, कोल्हार, लोहसर, भोसे, करंजी, राघूहिवरे, मोहोळ बुद्रुक. मोहोज खुर्द, रेणुकावाडी, वैजूबाभूळगाव, डोंगरवाडी, धारवाडी, कडगाव, दगडवाडी, मांडवे, निबोंडी, शिराळ, चिचोंडी, त्रिभुवनवाडी, पवळवाडी, कौडगाव, देवराई, घाटसिरस, डमाळवाडी, खांडगाव, जोहारवाडी गावांचा समावेश आहे.

या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, पाईप लाईनची खोली नियमाप्रमाणे नसल्याची तक्रार ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी केली. या पाईपलाईनच्या निकृष्ट कामाबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित अधिकार्‍यांनी या कामाची पहाणी करुन संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या. 312 किलोमिटर लांबीच्या या योजनेचे तोपर्यंत रात्रंदिवस काम करुन 50 किलोमीटरचे निकृष्ट काम झाले होते. निकृष्ट झालेल्या पाईपलाईनचे काम पुन्हा करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

उपोषण करण्याचा इशारा
आतापर्यंत या भागात कोट्यवधी रुपये खर्च करून वांबोरी पाईपलाईन योजना, तसेच मिरी-तिसगाव प्रादेशिक नळयोजना झाली. मात्र, त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये, म्हणून झालेले काम पुन्हा उकरून दुरुस्त करावे. अन्यथा जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर अमरण उपोषण बसण्याचा इशारा संदीप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र अकोलकर, महादेव अकोलकर, विठ्ठल मुटकुळे, शंकर आठरे, बाळासाहेब मुखेकर या शेतकर्‍यांनी दिला.

जलजीवन योजनेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील 38 गावांचा समावेश असलेल्या योजनेचे काम वेगाने सुरू आहे. या योजनेच्या खोदाईच्या तक्रारींची आपण दखल घेऊन कामाबाबत लवकरच निर्णय घेऊ.
                                                           -इजाज सय्यद, प्रोजेक्ट मॅनेजर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news