नगर; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या मानवी मैला खासगी वाहनांद्वारे नदीपात्रात सोडणारी दोन वाहने महापालिकाच्या पथकाने पकडली. त्यांच्याकडून प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल केला. महापालिकेच्या हद्दीत अनेक मानवी मैला उपसा करणार्या अनेक खासगी वाहने आहेत. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन ही खासगी वाहने अडबजूला नदीपात्रात मानवी मैला सोडतात. याबाबत महापालिकेत अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी स्वच्छता निरीक्षक विधाते यांच्या पथकाने जुना बोल्हेगाव रोड एल-एण्ड टी कंपनीच्या पाठीमागे सीना नदीपात्रात बेकायदेशीर रित्या मानवी मैला सोडणारे दोन वाहने पकडली. चालकांकडून प्रत्येक पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई घनकचरा विभागप्रमुख किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक विधाते, वालिकम, राजू शिंदे, विश्वनाथ वाघमारे यांच्या पथकाने केली.