नगर : धनादेश न वटल्या प्रकरणी व्यापार्‍यास शिक्षा | पुढारी

नगर : धनादेश न वटल्या प्रकरणी व्यापार्‍यास शिक्षा

शिरसगाव : पुढारी वृत्तसेवा : शेतीमालाच्या पोटी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी न्यायालयाने व्यापार्‍यास कैदेची शिक्षा सुनावली आहे.  कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथिल प्रथमेश ट्रेंर्ड्सचा पार्टनर शिवाजी नानासाहेब वर्पे याने शिरसगाव येथिल सदगुरू गंगागिरिजी महाराज ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी केशव गायकवाड यांच्याकडून शेतकर्‍याकडून खरेदी केलेला शेतमाल विकत घेतला होता. शेतमालाच्या रक्कमेपोटी रक्कम 4 लाख 62 हजार 21 रुपयांचा धनादेश केशव गायकवाड यांना दिला होता.

सदर धनादेश केशव गायकवाड यांनी कोपरगाव पिपल्स बँकमध्ये वठवणेसाठी जमा केला असता शिवाजी वर्पे यांच्या खात्यात पुरेसी रक्कम नसल्याने तो वटला नाही. त्यावेळी गायकवाड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शिवाजी वर्पे यांचे विरुद्ध कलम 138 नुसार कोपरगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. सदर खटल्याच कामकाज होवून आरोपी शिवाजी वर्पे यांना कोपरगाव येथिल अतिरिक्त मुख्य न्याय दंडधिकारी न्यायाधीश भगवान पंडीत यांनी तीन महिन्याची कैद व 4 लाख 62 हजार 21 रुपये यावर 1 लाखाची नुकसान भरपाई, अशी शिक्षा सुनावलेली आहे. फिर्यादी यांच्याकडून अ‍ॅड. माधुरी काटे यांनी काम पाहिले असून त्यांना अ‍ॅड. अशोकराव टूपके यांनी मार्गदर्शन केले. फसवणूक झालेल्यांना न्याय मिळाल्याने समाधान वाटले.

Back to top button