कोळपेवाडी : वारी वीज केंद्रास 60 लाखांच्या निविदा : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : वारी वीज केंद्रास 60 लाखांच्या निविदा : आ. आशुतोष काळे
Published on
Updated on

कोळपेवाडी(ता .कोपरगाव); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी उपकेंद्राचा वीज पुरवठा करण्याची क्षमता वाढवावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून वारी उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मंजुरी मिळविली होती. या माध्यमातून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यास अपेक्षित 60 लाख रुपये खर्चाच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव मतदार संघातील रस्ते, पाणी आदी मूलभूत प्रश्नांबरोबरच अनेक वीज उपकेंद्र कमी क्षमतेचे असल्याने वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नव्हता. यामध्ये तालुक्याच्या पूर्वेत वारी वीज उपकेंद्राचा समावेश होता.

या उपकेंद्रास जोडलेल्या अनेक गावांच्या नागरिकांनी वीज उपकेंद्राची क्षमता वाढवावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत आ. काळे यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केल्याने या वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यास मंजुरी दिली. यातून वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यास ऊर्जा विभागाने कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या. 60 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

यातून 3 एम. व्ही. ए. क्षमतेचे वारी वीज उपकेंद्र 5 एम. व्ही. ए. करण्यात येईल. लवकरच क्षमता वाढीचे काम सुरू होणार आहे. हे काम पूर्ण होताच या अंतर्गत सर्व गावांचा घरगुती, कृषी वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार आहे. वीज ग्राहकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आ. काळे यांच्या पाठपुराव्याने पूर्ण होणार आहे. पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होणार असल्याने वारी उपकेंद्राच्या अंतर्गत गावातील घरगुती व कृषी वीज ग्राहकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

अन्य कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू
चांदेकसारे व ब्राम्हणगाव येथे नवीन वीज उपकेंद्रास मंजुरी मिळाली आहे. ब्राम्हणगाव वीज उपकेंद्र निविदा प्रक्रियेत आहे. रवंदे उपकेंद्र क्षमता वाढ मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. खिर्डी गणेश (येसगाव), कोकमठाण, शिंगवे या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, शिंगवे ते पुणतांबा व काकडी ते रांजणगाव नवीन 33 के. व्ही. लिंक लाईन टाकणे, पुणतांबेतील 11 के. व्ही. बजरंगवाडी, रस्तापूर, रामपूर, पुणतांबा स्वतंत्र फिडरच्या कामास मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news