नगर : तीन कट्ट्यांसह बीड येथील सराईत गजाआड | पुढारी

नगर : तीन कट्ट्यांसह बीड येथील सराईत गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात कट्टे व काडतूसे विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या सराईताला एलसीबीने जेरबंद केले आहे. शहरातील आरटीओ कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून एक लाख 13 हजार रूपये किमतीचे तीन गावठी कट्टे व बारा काडतूसे जप्त केली आहेत.  सुयोग ऊर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (रा. माळीवेस, सुभाष रोड, बीड) असे आरोपीचे नावे आहे. गावठी कट्टे घेऊन एक सराईत आरटीओ कार्यालयासमोर उभा असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती.

त्यानुसार एलसीबीतील पोलिस कर्मचारी यांनी फळविक्रेते व रिक्षाचालक बनून परिसरात सापळा लावला. संशयिताची खात्री होताच पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी हा बीड जिल्ह्यातील सराईत असून, त्याच्यावर पुणे, औरंगाबाद, बीड व नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे 25 गुन्हे दाखल आहेत. एलसीबीचे सहायक फौजदार राजेंद्र देवमन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button