नगर : शहर बँकेसाठी अवघे 24.75 टक्के मतदान | पुढारी

नगर : शहर बँकेसाठी अवघे 24.75 टक्के मतदान

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या 15 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात 12 हजार 110 पैकी अवघ्या 2 हजार 997 मतदारांनी हक्क बजाविला. एकूण तीस मतदान केंद्रावर एकूण अवघे 24.75 टक्के मतदान झाले.
कोविडमुळे बँकेची निवडणूक लांबविणीवर पडली होती. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने निवडणुका घेण्याचे घोषित केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी निवडणूक जाहीर केली.

बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागा असून, त्यातील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. उर्वरित 14 जागांसाठी रविवारी मतदान झाले. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील एकूण 30 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक केंद्रावर 400 मतदार होते. तीसपैकी 18 मतदान केंद्रावर शंभरच्या आतच मतदान झाले. दरम्यान, नगर-पुणे रस्त्यावरील ओमगार्डन येथे सोमवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणुकीत घैसास-गुंदेचा मित्रमंडळाचे सुयश पॅनेलविरुद्ध अपक्ष अशी लढत झाली. संजय घुले यांच्या रुपाने सुयश पॅनेलला एक जागा बिनविरोध मिळाली.

Back to top button