नगर : अज्ञात वाहनाची धडक देवळालीचा तरुण ठार | पुढारी

नगर : अज्ञात वाहनाची धडक देवळालीचा तरुण ठार

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  दुचाकीवरून राहुरी फॅक्टरीवरून देवळालीकडे जाणार्‍या देवळाली प्रवरातील अशोक लोखंडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले.  धडकेमुळे लोखंडे जवळील ओढ्यात पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून, त्यातच ते मृत्यूमुखी पडले. स्व. अशोक लोखंडे हे फॅक्टरी- श्रीरामपूर रोडवरून घरी जात असताना वडाच्या झाडाजवळील ओढ्यानजीक त्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेने लोखंडे ओढ्यात पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातस्थळी ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, पप्पू कांबळे यांनी तातडीने मदतकार्य केले. लोखंडेंना खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले. यानंतर लोणी येथे प्रवरा रुग्णालयात हलविले, मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुली, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

Back to top button