नगर : खुनाची खोटी माहिती देणार्‍याला खावी लागली जेलची हवा | पुढारी

नगर : खुनाची खोटी माहिती देणार्‍याला खावी लागली जेलची हवा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  वरखेड (ता.नेवासा) येथे खून झाला आहे, अशी खोटी माहिती 26 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांनी नेवासा पोलिसांना डायल 112 वर देणार्‍या युवकाची रवानगी पोलिसांनी जेलमध्ये केली आहे. रामडोह (ता.नेवासा) येथील तुकाराम बाबूराव गोरे (वय 29) याने भारतीय प्रजासत्ताक दिनी सकाळीच पोलिस नियंत्रण कक्षाला डायल 112 वर कॉल करून वरखेड गावामध्ये खून झाला आहे, अशी खोटी माहिती दिल्याने नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलिस नाईक संजय माने, अशोक कुदळे असे पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले.

या पोलिस पथकाला वरखेड (ता.नेवासा) येथे गेल्यावर खोटी माहिती देणार्‍या व्यक्तिचे नाव तुकाराम गोरे व तो रामडोह येथील असल्याची माहती मिळाल्ली. पोलिस रामडोह येथे तुकाराम गोरे याच्या घरी गेले असता, तेथे कोणाचाही खून अथवा गुन्हा घडलेला नसल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्तिला डायल-112 च्याकॉलबाबत विचारपूस केली असता, त्याने खोटा कॉल केल्याचे सांगितले. तुकाराम गोरे यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, तो दारुच्या नषेत असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र पोलिसांना मिळाल्याने खोटी माहिती देणार्‍याला गोरे या युवकाला जेलची हवा खायला मिळाली.

पोलिसांच्या डायल 112 या प्रणालीवर अचडणीच्या वेळीच फोन करावा. खोटी माहिती देऊन दिशाभूल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
                                         – विजय करे, पोलिस निरिक्षक, नेवासा

Back to top button