अकोले : ‘त्या’ वाळू वाहणार्‍या वाहनांवर कारवाई कधी? चार दिवसांपासून विलंब

अकोले : ‘त्या’ वाळू वाहणार्‍या वाहनांवर कारवाई कधी? चार दिवसांपासून विलंब
Published on
Updated on

अकोले(ता. नगर); पुढारी वृत्तसेवा : महसूल पथकाने अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारी चार वाहने पकडली. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्यापि कोणतीच दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अकोले तहसील विभागाचा कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा बसण्याबरोबरच राज्याच्या महसूलात वाढ करण्यासाठी गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'महाखनिज' ही संगणक प्रणाली लागू केली आहे.

या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात तहसीलदार सतिश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार, मंडलधिकारी, तलाठी या पथकाने गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्‍याचा शोध मोहिमेत शुक्रवार दि.20 ते दि. 24 दरम्यान अकोले येथे कमलेश ढेरे (रा. धांदरफळ ) यांच्या मालकीचा एम एच 21 बी एच 3588 टेम्पो अवैध गौण खनिज दगड (कच) वाहताना महसूल पथकाला मिळून आला. तर पोपट कारभारी धुमाळ यांचा 7476 ट्रॅक्टर मुरूम अवैध उत्खनन व वाहतूक करताना अकोले परिसरात महसूल पथकास मिळून आला. तर जगन वसंत देशमुख यांचा एमएच 17 बी.डी 9907 हा डंपर क्रशसँड गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहताना तांभोळ परिसरात महसूल विभागाच्या पथकाला मिळुन आला आहे.

रूपाली रामभाऊ साळुंखे यांचा एमएच 04 जे यु 3233 हे वाहून गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहताना महसूल विभागाच्या पथकाला आढळून आले आहे. तसेच कोल्हार-घोटी रस्त्याचे डांबरी करणाच्या बारी येथे कामाचा परवाना असलेला समशेरपूर परिसरातील क्रशरचे फक्त तीन ब्रास खडी एमएच 16 सी.सी 3135 या बारा टायर असलेल्या ए. सी. शेख ठेकेदार यांच्या मोठ्या वाहनात सुमारे सहा ते आठ ब्रासच्या खडी वाहताना अकोले परिसरात महसूलच्या पथकाला आढळून आल्यावर हे वाहन ताब्यात घेत असताना महसूल पथकचे तलाठी, कर्मचार्‍यावर संबंधित रस्त्यावरील मॅनेजर व कर्मचार्‍यांनी दबाव टाकून वाहन सोडविण्यासाठी जीवाचा आटापिटा करत कमी ब्रासचा दंड भरण्यासाठी तहसील कार्यालयात ठाण मांडून बसल्याचे दिसून आले आहेत.

परंतु महसूल विभागाच्या निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार गौण खनिजाचे वाहताना संगणक प्रणालीचा अवलंब करुन नियमावलीनुसार वाहतूक करणे गरजेचे असतानाही गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणार्‍या वाहने अकोले तहसील विभागाचे प्रतिक खानेकर, खेमनर, तलाठी प्रविण ढोले, क़ोतवाल वडजे यांनी ताब्यात घेऊन अहवाल तहसीलदार सतीश थेटे यांच्याकडे सादर केला असल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍यावर काय दंडात्मक कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.

रस्ता दुरुस्ती नावाखाली गौण खनिज वाहतूक
अकोले महसूल पथकाने गौण खनिज असलेल्या एम. एच 04 जेयु 3233 या वाहनात महाराष्ट्र शासन, रस्ता रा.म.मा 222 वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे (सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले – 1) करण्यासाठीचे गौण खनिज आढळून आल्याने महसूल विभागाने हे वाहन ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे अनेक वाहने महाराष्ट्र शासन रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली गौण खनिज वाहताना सर्रास दिसून येत आहे. मात्र अकोल्यातील कामगार तलाठी, मंडलधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news