रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू; निंबळक गेटजवळील घटना | पुढारी

रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू; निंबळक गेटजवळील घटना

वाळकी(ता.नगर); पुढारी वृत्तसेवा : रेल्वे गाडीची धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर शहराजवळ असलेल्या निंबळक रेल्वे गेटजवळ सोमवारी (दि.23) सकाळी घडली. नितीन भटू जाधव (वय 33, रा.निंबळक, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे. निंबळक गावाजवळ असलेल्या रेल्वे गेटपासून 500 मीटर अंतरावर नितीन जाधव हा जखमी अवस्थेत सोमवारी (दि.23) आठच्या सुमारास काही नागरिकांना आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना व पोलिसांना कळविली.

त्याचे वडील भटू लक्ष्मण जाधव यांनी त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेले. मात्र, डॉक्टरांनी तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. मयत नितीन जाधव याचा टेलरिंगचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 1 लहान मुलगी असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button