नेवासा : रस्त्यांसाठी 63 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर : खासदार सदाशिव लोखंडे | पुढारी

नेवासा : रस्त्यांसाठी 63 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर : खासदार सदाशिव लोखंडे

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्र ग्रामसडक योजनेतंर्गत या मतदार संघातील 6 तालुक्यांतील 16 रस्त्यांना 63 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदार संघातील अकोले, कोपरगाव, नेवासा, राहता, राहूरी, संगमनेर या सहा तालुक्यांतील 16 रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 63 कोटी 50 लखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतंर्गत सहा तालुक्यांतील 16 रस्त्यांच्या कामाला मंजूरी मिळवून दिल्याने बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, जिल्हासंपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा उप प्रमुख भगवान गंगावणे, तालुका प्रमुख सुरेश डिके, नेवासा शहर प्रमुख बाबा कांगुणे आदींनी खासदार लोखंडे यांचे अभिनंदन केले.

नेवासा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश
तालुक्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील खुनेगाव ते भेंडाखुर्द रोड, शिरसगाव ते देशमुखवस्ती ते गोगलगाव रोड, राज्यमार्ग 50 (सौंदाळा) ते रांजणगाव रोड वस्ती ते नागापूर ते राज्यमार्ग या रस्ता कामांना मंजूर झालेली असून, प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे.

Back to top button