नगर : हिंदू राष्ट्र सेनेच्या 24 जणांवर गुन्हा दाखल; परवानगी नसताना शहरातून रॅली

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना तसेच पोलिस प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना रॅली काढून घोषणाबाजी केल्याने हिंदू राष्ट्र सेनेच्या 24 पदाधिकार्यांवर कोतवालीत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अभय रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे. निखील धंगेकर, घनशाम बोडखे, ओंकार घोलप, शुभम उर्फ परशा कोमाकुल, गामा भागानगरे, सागर ठुमणे, दर्शन अभय बोरा, आनंद राजू नायकू, मनोज औशीकर, आकाश भोसले, केशव संजय मोकाटे, रोहित सोनेकर, शिवम घोलप, ओंकार इरमल, ऋषिकेश चक्के, सिद्धांत जाधव, सनी फाटक, कार्तीक काळे, केदार रासकर, अक्षय कुमार, सागर शिवले, ओंकार बिडकर, सोनी आहेर, विशाल ठाकूर (सर्व रा. अहमदनगर) अशा 24 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी (दि.22) सायंकाळी हिंदू जनजागृती समितीतर्फे सावेडीतील जॉगिंग ट्रक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमिवर हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सावेडीतील जॉगिंग पार्क पर्यंत बाईक रॅली काढून घोषणाबाजी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलसौंदर चौक-पंचपीर चावडी व तख्ती दरवाजा येथून जात असताना आवेशपूर्ण आवाजात घोषणाबाजी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल नितीन गाडगे करीत आहेत.